नवी दिल्ली : भारतातील लोकांचे सरासरी वय आता वाढले आहे. आता देशातील लोकांचे सरासरी वय ६७.७ वर्षे झाले आहे, जे आतापर्यंत ६२.७ वर्षे होते. याशिवाय भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्नही वाढले आहे. देशातील दरडोई उत्पन्न ६९५१ डॉलरपर्यंत वाढले आहे तर संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकात भारत १९३ देशांपैकी १३४ व्या क्रमांकावर आहे. मानव विकासाच्या स्थितीमुळे भारत मध्यम मानव विकास श्रेणीत आला आहे. यामध्ये अजूनही भारताची स्थिती चिंताजनक आहे. याशिवाय, भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही प्रगती दर्शवली आहे.
मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. या निर्देशांकात भारताच्या स्थानात एक क्रमांकाची प्रगती झाली आहे. मात्र २०२१ मध्ये जगातील १९१ देशांपैकी १३५ व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये १९३ देशांपैकी १३४ व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) अहवालात भारतासह सर्व देशांची यासंदर्भातील आकडेवारी उघड झाली आहे. भारताचा मानव विकास निर्देशांक मूल्य २०२१ मधील ०.६३३ च्या तुलनेत २०२२ मध्ये ०.६४४ असा किंचित प्रमाणात सुधारला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाचा ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक : रीइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड’ शीर्षकाचा हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *