मुंबई : चुनाव आयोग हा भाजपचा चुना लगाव झाला आहे टी एन शेषण यांच्या काळातील तटस्थ नि:पक्ष निवडणूक आयोग राहिलेला नसून गेल्या दहा वर्षात याचे खासगीकरण झाले आहे अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे त्या राजीनामाबाबात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हि टीका केली आहे. राऊत म्हणाले की, अरूण गोयल यांना सर्व नियम कायदे संविधान डावलून निवडणूक आयुक्त केले हेाते प्रशांत भूषण यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती गोयल यांच्या नेमणुकीवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यावेळी सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काही तरी ठरवून घोळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग हा भाजपच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात दिलेल्या निर्णयावरून स्पष्ट हेाते पक्षांतंरबंदी कायद्याचे सरळसरळ उल्लंघन झालेले असताना दहाव्या परिशिष्ठाची मोडतोड केलेली असतानाही निवडणूक आयेाग भाजपच्या दबावाखाली धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला होता त्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही असेही राऊत म्हणाले.
अरूण गोयल यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामागे मोदी शहांचा काही तरी डाव असेल असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. कारण त्यांनी नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा दिलेला नाही त्यांची नेमणूकच अनैतिक होती अनैतिक पध्दतीने झालेली व्यक्ती नैतिक करण्यासाठी राजीनामा देईल का ? ज्यांनी त्यांना नेमले त्यांनीच त्यांना दूर केले आता त्या जागी भाजपकडून आखणी कए उपयुक्त व्यक्ती नेमली जाईल असे राऊत म्हणाले.