सर्वपक्षीय आमदारांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला भरघोस निधी
डोंबिवली: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात दीड वर्षात ११५६ कोटी रुपयांचा विकास निधीतून कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना त्या विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिला आहे.चव्हाण यांनी त्यासंदर्भात सोमवारी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, शांताराम मोरे 290 कोटी, महेश चौघुले 42 कोटी, किसन कथोरे 287 कोटी, राजू पाटील 127कोटी, विषवनाथ भोईर 27कोटी, दौलत दरोडा 227कोटी, गणपत गायकवाड 62कोटी, कुमार आयलानी 92 कोटी असे मिळून 1156 करोड रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरू आहेत, मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून दीड वर्षात राज्यात सर्वत्र विभागामार्फत विकास कामांसाठी प्रचंड निधी देण्यात आला असून ठाणे जिल्ह्याची माहिती त्यांनी विशद केली.
यासह टिळकनगर महाविद्यालय, जोंधळे महाविद्यालय, स वा जोशी महाविद्यालय येथे विधी कॉलेज सुरू करण्यात देखील तांत्रिक परवानग्या मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.