कॅलिफोर्निया: तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी सिस्को सिस्टम्स त्याच्या ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनी सध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी अनुभवत आहे. त्यामुळे कंपनी त्यांच्या ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. सिस्को सिस्टम्सकडे गेल्यावर्षी जवळपास ८५ हजार कर्मचारी होते. यातील सुमारे ४ हजार नोकऱ्या कमी केल्या जाणार आहेत.
सिस्कोची पुनर्रचनेची योजना आहे. कंपनीच्या पुनर्रचनेसाठी सुमारे ५०० दशलक्ष डॉलर खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. सिस्कोने महसूल अंदाज ५३.८-५५ अब्ज डॉलरवरून ५१.५-५२.५ अब्ज डॉलरपर्यंत कमी केला आहे. दरम्यान, सॅन जोस, कॅलिफोर्निया येथील ही कंपनी खर्च मर्यादित ठेवत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी कॉन्फरन्समध्ये विश्लेषकांना सांगितले की, ग्राहक अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंतित आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडून ऑर्डरला विलंब होत आहे आणि त्यांना किती उपकरणांची आवश्यकता असू शकते यावर पुनर्विचार केला जातो. दरम्यान, या कमकुवत परिस्थितीमुळे काल अमेरिकेतील बाजारात सिस्कोचे शेअर्स ६.७ टक्क्यांनी घसरले. नोव्हेंबर २०२२ मध्ये सिस्कोने अर्निंग कॉलदरम्यान पुनर्रचनेचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी त्यांच्या सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!