मुंबई : राज्यात आजपासून मराठा सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. यामुळे रुग्णालये व शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज मराठा पदयात्रेचा चौथा दिवस असून पदयात्रा पुणे शहरात धडकणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन छेडले आहे मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे त्यासाठी त्यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. आता हि पदयात्रा पुण्याच्या दिशेन येत आहे. सरकारने गोळया घातल्या तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण मोहिम हाती घेतली असून २३ जानेवारीपासून याला सुरूवात झाली आहे २३ ते ३१ जानेवारीदरम्यान ३६ जिल्हे २७ महापालिका आणि ७ अर्ध सैनिक वसाहती यामध्ये हे सर्वेक्षण हेाणार आहे आठ दिवस चालणा-या मोहिमेत सुमारे अडभ्च कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी सव्वा लाख प्रगणक आणि अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे
२४ जानेवारीला क्यरेटिव्ह पिटीशन सुनावणी
मराठा आरक्षणावर दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी दीड वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल. या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं होतं.