तुंगी जिल्हा परिषद शाळेस शालेय व खेळाच्या साहीत्यासह वाॅटर फील्टरची भेट
बदलापूरच्या नर्चरिंग द फ्युचर फाऊंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी
कर्जत : कर्जत तालुक्यातील डोंगर शिखरावर वसलेले व शासनाच्या मुलभुत सोई सुविधांपासुन वंचित असलेले तुंगी हे गाव. या गावात जाण्यासाठी सुमारे एक ते दिड तास चालुन खडतर डोंगरघाट पार करुन जावे लागते. अशा ह्या तुंगी गावात अजुनही विजपुरवठा, रस्ता वा पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय नाही. येथील ग्रामस्थ ह्या मुलभुत सुखसोईं मिळण्याकरता वर्षानुवर्षे चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. पशु पक्षांना ज्या मुलभुत गरजा सहज मिळतात त्या सामान्य मुलभुत गरजा शेकडो वर्षांपासुन तुंगी गावक-यांना मिळालेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर बदलापुर येथील नर्चरिंग द फ्युचर फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेने नुकतेच तुंगी गावातील रा.जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी व खेळाच्या साहीत्यासह पिण्याच्या पाण्याचे वाॅटर फील्टर भेट देवुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना बॅटबॉल किट, बॅटमिंटन, फूटबॉल, स्कीपिंग रोप, रिंग, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकलेची पुस्तके, चित्रकलेचे साहित्य इत्यादी वस्तु भेट म्हणुन दिल्या. नर्चरिंग द फ्युचर फाऊंडेशन, बदलापुर ह्या संस्थेची स्थापना २०१४ साली झाली असुन संस्थेचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य व शिक्षणाविषयी सुविधा पुरवणे व त्यांचे राहणीमान उंचाविणे हा असुन संस्थेने आत्तापर्यंत तुंगी सारख्या गावाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुमारे 8 ते 10 आदिवासीं पाड्यांना भेट देवुन अशा प्रकारची मदत केलेली आहे. तुंगी येथील रा.जि.प. प्राथमिक शाळेस वरील साहित्य व वाॅटर फील्टर भेट देतेवेळी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक परटोतर सर, लांबूटे सर, भालचिम सर, सरिता पांडे, दिलीप धात्रक, जयश्री धात्रक, अजय घुगे, ज्ञानदेव फड, सरिता फड, स्वाती बोराडे, सुमित कांबळे, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तुंगी सारख्या गावातील ग्रामस्थांना शासनाने किमान रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्याविषयक सुविधा व येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे मत संस्थेच्या ज्ञानदेव फड ह्यांनी व्यक्त केले.
Well-done team badlapur you done this by right way and to the needy ones. I visited to tungi ones. And I understand all actual conditions.