लडाख, 17 जानेवारी – नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी 16 जानेवारी रोजी आय. एन. एस. शिवाजी येथे भारतीय नौदलाच्या चादर ट्रेक (गोठलेली झांस्कर नदी, लडाख) मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. नौदल प्रमुखांनी पथकाचे प्रमुख कमांडर सी. डी. ओ. नवनीत मलिक यांच्याकडे औपचारिक आइस एक्स सुपूर्द केला आणि त्यांना मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
14 सदस्यांचे पथक 11,000 फूट उंचीवरील शिखर सर करेल आणि तिथे राष्ट्रध्वज आणि नौदलाचे चिन्हध्वज फडकवेल.
ही मोहीम भारतीय नौदलाच्या साहसी मनोवृत्तीचे मूर्त स्वरूप आहे. आव्हाने तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असलेले मजबूत आणि लवचिक कार्यबल तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.