टोकियो : जपानमध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या मिनिटागणिक वाढत आहे. मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. सर्वाधिक विध्वंस इशिकावा प्रांतात झाला. इशिकावा प्रीफेक्चर आणि आजूबाजूच्या भागात सोमवारी झालेल्या सुमारे १०० भूकंपांपैकी ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप हा सर्वाधिक होता.
जपान टाइम्सच्या अहवालानुसार, सरकारने 48 मृत्यूची पुष्टी केली आहे परंतु मृतांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. किनारी शहरे चिखलात बुडाली आहेत. प्रभावित भागातून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत किमान 57 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारचे प्रवक्ते योशिमासा हयाशी यांनी सांगितले की, काही भागात अजूनही पाणी, वीज आणि मोबाइल फोन सेवा खंडित आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मंगळवारी सांगितले की, जपानच्या लष्कराने बचाव कार्यात सामील होण्यासाठी आपत्तीग्रस्त भागात 1,000 सैनिक पाठवले आहेत. सरकार नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.