टोकियो, १ जानेवारी : सोमवारी जपानमध्ये आलेल्या जोरदार भूकंप आणि सुनामीनंतर भारतीय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत.
दूतावासाने म्हटले आहे की कोणत्याही मदतीसाठी खालील आपत्कालीन क्रमांक आणि ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतो. दूतावास संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे वृत्त आहे. हे दूरध्वनी क्रमांक आहेत 81-80-3930-1715 (याकुब टॉपनो) 81-70-1492-0049 (अजय सेठी) 81-80-3214-4734 (डी.एन. बरनवाल) 81-80-6229-5382 (एस. भट्टाचार) -80-3214-4722 (विवेक राठी). याशिवाय sscons.tokyo@mea.gov.in आणि offffseco.tokyo@mea.gov.in असे दोन प्रमुख ई-मेलही जारी करण्यात आले आहेत.