मेट्रोचे कारशेड कल्याण बस डेपोच्या जागेत उभारावे : मनसेचे सचिव इरफान शेख यांची मागणी

कल्याण- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे कल्याणमधील शेवटचे स्थानक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रस्तावित आहे. बाजार समितीने समितीच्या जागेत स्टेशन उभारण्यास तसेच कारशेड करण्यास विरोध दर्शविला आहे. हा विरोध पाहता कारशेड व स्टेशन हे कल्याण बस डेपोच्या जागेत उभारावे अशी मागणी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.
ठाणो-भिवंडी-कल्याण हा मेट्रो रेल्वे मार्गाला मुख्यमंत्र्यांनी  मंजूरी दिली आहे. मेट्रो रेल्वेमार्गात १६ स्थानके आहे. कल्याण दुर्गाडी चौक, सहजानंद चौक आणि बाजार समिती ही तीन स्थानके कल्याण पश्चिमेच्या हद्दीत आहेत. शेवटचे स्थानक हे बाजार समितीच्या ठिकाणी आहे. तसेच कारशेडसाठीही मेट्रोला जागा हवी आहे. जागा देण्यास बाजार समितीने विरोध केला आहे. कारशेड व स्टेशन सवरेदय मॉलच्या ठिकाणी तसेच गोविंदवाडी बायपास रस्त्यानजीक उभारावे अशी सूचना बाजार समितीने एमएमआरडीएकडे केली आहे. या पाश्र्वभूमीवर शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे की, मेट्रोचे कल्याणमधील शेवटे स्थानक व कारशेडसाठी कल्याण राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोच्या जागेचा विचार करावा. एमएमआरडीएला एअर स्पेस हवी आहे. तसेच मेट्रोचा मार्ग दुर्गाडी, सहजानंद चौक व बाजार समिती असा न ठेवला. दुर्गाडी, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, सिंधीकेट ते कल्याण स्टेशन असा करण्यात यावा. हाच मार्ग व्यावहारीक ठरेल. या मार्गामुळे कल्याण रेल्वे स्थानक व मेट्रो रेल्वे स्थानकाची जोडणी करणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!