कल्याण : कल्याण शहरात दहशत माजविणा-या रूपेश कनोजिया या गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळून कोळसेवाडी पोलिसांनी त्याची भरस्त्यातून वरात काढली आहे. दहशतीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेला त्रास देणा-या या गुन्हेगाराची दहशत पोलिसांनी मोडून काढल्याने कल्याणकरांनी पोलिसांचे कौतूक केले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रात्रीच्या सुमारास रहिवासी परिसरात गोंधळ घालणे अशा प्रकारे रूपेश कनोजिया दहशत पसरवत होता. अनेक गुन्हयात तो फरार होता. कल्याण पूर्वेत एका ठिकाणी कनोजिया हा एकाला मारहाण करीत असल्याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. रुपेश पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरून अटक केली. २०२१ पासून रुपेशने गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या भूमिकेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

कल्याण पूर्वेत गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असतो. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात. पोलिसांसमोर गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहे. सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!