डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील उल्हास खाडी भागात शनिवारी दुपारी वडील आणि त्यांची अडीच वर्षाची मुलगी वाहून गेली आहे. शनिवारी दुपारपासून केडीएमसीच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस संयुक्तपणे शोध मोहीम राबवित आहेत. २४ तास उलटूनही बेपत्ता बाप-लेकीचा शोध लागत नसल्याने तपास पथके त्यांच्या खाडी भागात शोध घेत आहेत.

पश्चिमेतील गणेशनगर भागात राहणारे अनिल सुरवाडे (४०) शनिवारी दुपारी दीड वाजता त्यांची अडीच वर्षाची मुलगी ईरा हीला घेऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी भागात फिरण्यासाठी गेले होेते. खाडी लगतच्या जेट्टीवर ईरा खेळत होती. वडील तिच्यापासून काही अंतरावर बसले होते. खेळताना ईराचा तोल जाऊन ती जेट्टीवरून खाडीत पडली. मुलगी पडली म्हणून वडील अनिल यांनी तात्काळ खाडीत उडी मारली. पाण्याचा वेगवान प्रवाह आणि दलदलीमुळे ते मुलीला वाचवू शकले नाही. मुलीला वाचविण्याचा प्रयत्नात अनिलही वाहून गेले. हा प्रकार खाडी किनारी दूर अंतररावर असलेल्या दोन तरूणांना दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलीस शनिवारपासून बपत्ता बाप आणि लेकीचा शोध घेत आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेपत्ता बाप आणि लेकीचा शोध घेत असताना अग्निशमन दलाच्या जवानांना खाडीत कल्याण परिसरातून वाहून आलेले शव आढळले. तपास पथकांनी हे शव ताब्यात घेतले. त्याची ओळख अद्याप फटलेली नाही.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!