तोतया पोलिसाने मारला सोन्याच्या दागिन्यावर हात

डोंबिवली : पूर्वेकडील सागाव येथील ओम साई निवास मध्ये राहणारे गंगाराम ठाकूर हे 63 वर्षीय वयोवृद्ध सकाळी मॉर्निंग वॉक करीत असतानाच दोन अनोळखी इसमानी त्यांना हटकले. आम्ही पोलीस आहोत आमच्या साहेबांनी दागिने घालू नका असे सांगितले आहे अशी बतावणी करीत बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळ असलेली सोन्याची चैन ,ब्रेसलेट व अंगठी असा 48 हजारांचा मुद्देमाल एका कागदात ठेवण्याच्या बहाण्याने हातात घेत पळ काढला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली करण्यात आलीय,

पैसे दिले नाही  म्हणून पत्नीचे केस कापले

कल्याण : पत्नीने पैसे न दिल्याने संतापलेल्या पतिने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करत तिचे केस कापून तिला विद्रुप केल्याची घटना कल्याणात घडली आहे .या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी या विकृत पतीला अटक केली आहे . पीडीत महिलेचे कल्याण मधील एका इसमाशी लग्न झाले होते.काही दिवसांपासून हा पती सदर पिडीत महिलेकडे वारंवार पैशांची मागणी करत होत मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्याने अखेर या पतीने कोर्याची परिसीमा गाठली .या पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत तिला मारहाण करत तिचे हात पाय बांधून तिचे केस कापत तिला विद्रूप केले .सदर पिडीत महिलेने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी पती विरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे .

हप्ता न दिल्याने मच्छीविक्रेत्यान मारहाण

कल्याण : हप्ता देण्यास नकार दिल्याने २० ते २५ जणाच्या टोळीने चार मच्छी विक्रेत्यांना लोखंडी रोड तलवारीच्या सहय्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी येथे घडली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दीपक लोखंडे ,दत्ता लोखंडे यांच्या सह २० ते २५ इस्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डी.बी चौक येथे मुकेश पाटील ,साईनाथ पाटील ,राहुल पाटील ,मयूर पाटील हे चौघे मच्छी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या चौघांकडून दीपक लोखंडे ,दत्ता लोखंडे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी या ठिकाणी व्यवसाय करण्या करीता दिवसाला ४०० रुपये प्रमाणे महिन्याला १२ हजारांचा हप्ता द्या असे सांगितले होते मात्र या चौघांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दीपक लोखंडे ,दत्ता लोखंडे व त्यांच्या २० ते २५ साथीदारांनी शनिवारी चौघांना हॉकी स्टिक ,लोखंडी सळई,रॉड आदीनी मारहाण केली.या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल  करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तप सुरु केला आहे .

नफ्याचे आमिष दाखवून आठ लाखांना गंडा

कल्याण : डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोड उमेश नगर साई सिद्धी विनायक सोसायटी मध्ये राहणारे शशांक माणगावकर यांनी डोंबिवली पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या कल्पेश पांचाळ याच्याशी ओळख होती .कल्पेश याने माणगावकर यांना करन्सी ट्रेडिंग व्यव्सायासाठी पैसे पाहिजेत त्यातून होणार्या नफ्यातून तुम्हला प्रतिमहा १४ टक्के रक्कम परतावा म्हणून देईन असे सांगून त्याच्याकडून ६ लाख रुपये घेतले त्यानंतर कल्पेश ने संदेश चौधरी याना देखील १५ टक्के प्रतिमहा चे आमिष दाखवून त्याच्याकडूनही २ लाख रुपये घेतले मात्र १० महिने उलटूनही अद्याप काही परतवा न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी त्यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कल्पेश पांचाळ विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!