नवी दिल्ली, १८ डिसेंबर : संसदेतील सुरक्षेच्या मुद्यावरून दोन्ही सदनात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील ७८ खासदारांना आज, सोमवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी दोन्ही सदनातील १४ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन्ही सदनातील एकूण ९२ खासदार निलंबित करण्यात आले आहेत.
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून आज, सोमवारी दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. गेल्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून काही तरूण लोकसभेत घुसले होते. त्यानंतर त्याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज, सोमवारी देखील संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी, के जय कुमार, अपूर्व पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार यांच्याशिवाय, अँटोनी अँटोनी, एसएस पलानामनिकम, अब्दुल खालिद, तिरुवरुस्कर, विजय बसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू यांना निलंबित करण्यात आले.
हाच प्रकार राज्यसभेतही अनुभवास आला. त्यामुळे सभापतींनी राज्यसभेच्या प्रमोद तिवारी, जयराम रमेश, डॉ. अमी याज्निक, नरेंद्रभाई जे. राठवा, सय्यद नासिर हुसेन, फुलो देवी नेताम, शक्तीसिंग गोहिल, केसी वेणुगोपाल, रजनी अशोकराव पाटील, रणजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला, सुखेंदू शेखर रे, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, माँ चीन बिस्वास, मा. बराईक, समीरुल इस्लाम, एम. षणमुगम, एनआर एलेंगो, कनिमोझी एनव्हीएन सोमू, आर गिरीराजन,मनोज कुमार झा, फैयाज अहमद, व्ही शिवसदन, रामनाथ ठाकूर, अनिल प्रसाद हेगडे, वंदना चव्हाण, राम गोपाल यादव, जावेद अली खान, महुआ मांझी, जोस के मणी, अजित कमर भुयान या सदस्यांना निलंबित केले.