१७ डिसेंबर मुंबई: शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी एक प्रकरण गुजरात हायकोर्टात गेलं आहे. नोकरीच्या निमित्ताने पतीपासून दूर राहणार्या महिलेने हायकोर्टात धाव घेतली आहे.
महिन्यातीत दोन साप्ताहिक सुट्ट्या पतीसोबत घालवल्याने वैवाहिक कर्तव्य पूर्ण होत नाही का? अशी विचारणा महिलेने केली आहे. विशेष म्हणजे पतीने याआधी आपल्या पत्नीविरोधात फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती.
महिलेच्या पतीने हिंदू वैवाहिक कायदा कलम ९ अंतर्गत शारीरिक संबंधांच्या अधिकारासाठी सुरतच्या फॅमिली कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती. पत्नीने आपल्या जवळ येऊन राहावे यासाठी कोर्टाने आदेश द्यावे अशी मागणी पतीने केली होती.
सदर जोडप्याला एक लहान मुल देखील आहे.पतीने याचिकेत म्हटलंय की, त्याची पत्नी त्याच्यासोबत दररोज राहत नाही. मुलाच्या जन्मानंतर ती नोकरीच्या निमित्ताने आपल्या आई- वडिलांजवळ राहते. पत्नी केवळ महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या हफ्त्यात त्याला भेटायला येते.
इतरवेळी ती आपल्या आई-वडिलांसोबत पाहते. पत्नी मुलाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून वैवाहिक अधिकारांपासून मला वंचित ठेवत नोकरी करत आहे.पतीची याचिका रद्द करावी यासाठी महिलेने हाय कोर्टात धाव घेतली. पतीने दाखल केलेली याचिका चालवण्या योग्य नाही असं महिलेनं म्हटलं.
पत्नीने म्हटलं की, ‘ती महिन्यातील दोन दिवस नियमित पद्धतीने पतीच्या घरी जाते. पती दावा करतोय की त्याने मला सोडलं आहे.’ कोर्टाने महिलेची मागणी फेटाळली आहे. तसेच याप्रकरणी सुनावणीची आवश्यकता असल्याचं म्हटलं.