डोंबिवली : कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये दंडात्मक कारवाई झालेल्या वाहन चालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलेल्या चालकांनी न्यायालयीन तिजोरीत दंडाची रक्कम भरणा केली. तर उर्वरित चालकांनी वाहतूक नियंत्रण शाखेत जाऊन दंड रक्कम भरणा केली. या सर्व चालकांची मिळून एकाच दिवसात १५ लाख ७६ हजारांची दंड वसूली झाल्याचे वृत्त आहे.
वाहतुकीचे वेगवेगळे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र लावलेला दंड वसूल करण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही वाहन चालक दंड भरत नसल्याने अशा वाहन चालकांवर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यासाठी पोलिसांनी या वाहन चालकांवर न्यायालयीन कारवाईसाठी शनिवारी लोकअदालतच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित राहण्याच्या नोटीसा बाजावल्या होत्या. पोलिसांनी नोटीसी कारवाया सुरू केल्यानंतर वाहन चालकांमध्ये धडकी भरली होती. यात १ हजार २२५ वाहन चालकांनी लोकअदालतीत उपस्थित राहून ८ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड न्यायालयीन तिजोरीत भरणा केला. तर १ हजार २७६ चालकांनी ७ लाख ६३ हजार ९०० रुपयांचा दंड कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपशाखेत तडजोड करून भरला. एकंदरीत शनिवारी, नऊ तारखेला एकाच दिवशी लोकअदालत आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून १५ लाख ७६ हजार 800 रुपयांची वसुली वाहतूक नियंत्रण शाखेकडे जमा झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश बने यांनी