कल्याण : कल्याण फौजदारी वकील संघटनेचे सदस्य एडव्होकेट प्रदीप बावस्कर यांच्या मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे तसेच ए एस जी आय हॉस्पिटल कल्याण ब्रांच आणि कल्याण फौजदारी वकील संघटना यांच्या सहकार्याने राष्ट्रीय वकील दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्याचे वाटप दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी कल्याण फौजदारी संघटना वकील कक्ष येथे पार पडला . या शिबिराचे उद्घाटन सेशन कोर्ट न्यायाधीश कचरे आणि न्यायाधीश अष्टुरकर यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमास सुमारे २५० वकील बंधू-भगिनींनी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्याचा लाभ घेतला .
या कार्यक्रमास कल्याण सेशन कोर्टाचे न्यायाधीश न्यायाधीश गिरवलकर, न्यायाधीश गाडे, न्यायाधीश जनकवर आणि कोर्ट स्टाफ तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या शिबिरास भेट दिली तसे उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मैत्रीत्व सामाजिक संस्था तसेच एडवोकेट दिनानिमित्त सर्व वकील बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या. मैत्रीत्व सामाजिक संस्था ही अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. कोरोना कालावधीतही एड. प्रदीप बावस्कर यांनी मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना ठिकठिकाणी जाऊन मदत पोहोचवली आहे.
या शिबिरास कल्याण फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप , गणेश पाटील, क्रांती रेाटे, अर्चना पैठणकर , मनीषा दिवरे , सचिन वनसाळे , अबिन गायकर , सुरेश भगत , सुनील कटारिया , किरण कांबळे, चंद्रकांत कांबळे, या सर्व वकील मंडळींनी आणि कमिटी मेंबर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कल्याण फौजदारी आणि दिवाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व वकील बंधू भगिनींनी एडवोकेट प्रदीप बावस्कर तसेच ए एस जी आय हॉस्पिटल कल्याण ब्रांच यांचे आभार मानले.