डोंबिवली : आईचे सोन्याचं मंगळसूत्र असलेली बॅग रिक्षात विसरल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तत्परतेने तपास करून रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि मुलाला मंगळसूत्र असलेली बॅग परत मिळवून दिली. मानपाडा पोलिांच्या तत्परतेचे कौतूक होत असून मंगळसूत्र परत मिळाल्याने आई आणि मुलाच्या चेह-यावर आनंद पसरला आहे.

मिरारेड येथे राहणाऱ्या रोहित पासवान हा आईने बिहार येथील गावी सरफाकडे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवला.आईचा मंगळसूत्र सोडवण्यासाठी रोहितने दिवस रात्र मेहनत करून पैसे जमा केले . काल त्याने गावी जावून मंगळसूत्र ही सोडून आणला. घरी परतत असताना डोंबिवली मानपाडा येथील राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तो कल्याण ते मानपाडा रिक्षाने प्रवासा केला. नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर मंगळसूत्र असलेली बॅग रिक्षात राहिल्याचे त्याच्या लक्षात आले मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. रोहितकडे रिक्षाचा नंबर नव्हता त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक अविनाश वणवे,पोलीस हवालदार यल्लाप्पा पाटील आणि देवा पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेऊन सदरची बॅग व त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र वपोनी होनमाने आणि पोलीस निरीक्षक वणवे यांच्या हस्ते प्रवासी रोहित पासवान यांना परत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!