मुंबई, 7 डिसेंबर : नेरळ – अमन लॉज – माथेरान शटल सेवा अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ३,३४,०४२ प्रवाशांची वाहतूक करून २.३६ कोटी महसूल प्राप्त झाला.

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ/अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्याबरोबरच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एकूण एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २.३६ कोटी रूपये महसूल प्राप्त झाला.

हि संख्या या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेची प्राधान्य भूमिका दर्शवतात.

मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मन मग्न होते.

महिनाएकूण प्रवाशी संख्याएकूण उत्पन्न (रु. मध्ये)
एप्रिल -२०२३४०,०२३३०,१६,५५०
मे-२०२३५६,९३१४६,४८,८६१
जून-२०२३४०,३६२२८,७२,५७४
जुलै -२०२३३९,१७९२७,५८,०२१
ऑगस्ट -२०२३४०,३९६२६,५५,९३५
संप्टेबर -२०२३३५,८१७२३,२३,८६५
ऑक्टोबर -२०२३३४,८८७१९,५७,५९२
नोव्हेंबर -२०२३४६,४४७३३,७६,६४४
एकूण३,३४,०४२२,३६,१०,०४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!