राजावाडी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे :  चोरीचा दुसरा प्रकार उघड

चोरांबरेाबर कुत्रयांचाही वावर, सीसी टिव्ही यंत्रणा नादुरूस्त 

घाटकोपर ( निलेश मोरे ) : मुंबई उपनगरातील राजावाडी रुग्णालयातील महिला वॉर्डातून एका महिलेची पर्स व मोबाईल चोरी करणा-या चोरटयास सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे. तीन महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने या रुग्णालयात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी तिलाही पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच लहान बाळांना पळविण्याच्याही घटना अनेकवेळा घडल्या आहेत.  रूग्णालयातील सीसीटिव्ही यंत्रणाही बंद अवस्थेत आहेत. वारंवार घडणा-या घटनांमुळे रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

गुरुवारी महिला वार्ड विभागातून एका महिलेची पैशांची पर्स व मोबाईल चोरी करताना संतोष म्हात्रे या चोरटयास  येथील सुरक्षा रक्षक रेखा वाघमारे व भगवान परब यांनी दक्षता समितीचे सदस्य प्रकाश वाणी आणि काही सहकाऱ्याच्या मदतीने चोरटयास पकडून टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.  रुग्णालयात चोरांबरोबरच भटक्या कुत्रयांचाही वावर वाढला आहे.  बिनधास्तपणे ते रूग्णालयात फिरत असतात. यापूर्वी भटक्या कुत्र्यांनी  तीन डॉक्टरांना चावा घेतलाय मात्र तरीसुध्दा रूग्णालय प्रशासनाकडे याकडं दुर्लक्ष केलय. रुग्णालयात  सी सी टीव्ही बसवण्यात आले आहेत मात्र ते बंद असल्याने केवळ शेाभे पुरतेच उरले आहेत. त्यामुळे रूग्णालयातरील रूग्ण डॉक्टर व रूग्णांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही सुरू करण्यात यावेत तसेच महत्वाच्या ठिकाणी नवीन सीसीटिव्ही बसविण्यात यावे अशी मागणी दक्षता समितीचे सदस्य प्रकाश वाणी यांनी केलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *