गुजरात निवडणूक प्रचारासाठी मुंबईतून काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांची फौज
मुंबई : आगामी गुजरात निवडणुकीसाठी मुंबईतून काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली असून मंगळवार, २१ नोव्हेंबर २०१७ पासून दक्षिण गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण गुजरात विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घरोघरी फिरून काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. निरूपम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यांची फौज गुजरातमध्ये दाखल होणार आहे.
गुजरात निवडणुक दौऱ्यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी गुरूवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी यावर चर्चा झाली. या बैठकीस माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निरुपम म्हणाले की काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरातमध्ये प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातमधील लाखो लोक त्यांच्या सभेला गर्दी करत आहेत. शेतकरी, कामगार, उद्योजक, दलित, पाटीदार समाज अशा सर्व स्तरातून राहुल गांधींमुळे काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एका सर्वेनुसार गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये याआधी ३० % चा फरक होता तो आता ६ % वर आलेला आहे. असेही निरूपम यांनी सांगितलं.
Nice