मुंबई कसारा लोहमार्गावर लोकल, मेल, एक्स्प्रेस, खोळंबल्या
ठाणे अविनाश उबाळे : वाढत्या थंडीमुळे मध्य रेल्वेच्या मुंबई ते कसारा घाट दरम्यान लोहमार्गावर शनिवारी प्रचंड पांढरे गडद असे धुकं सर्वत्र पडल्याने लोहमार्गावर लोकल आणि एक्स्प्रेस धिम्या गतीने धावत होत्या या हिवाळ्यातील नैसर्गिक हवामान बदलामुळे व दाट धुक्यांमुळे दृश्यमानता अत्यंत कमी होते, यामुळे मोटरमनला पुढचे काही एक दिसत नाही प्रवासी सुरक्षिततेसाठी वेगमर्यादेसह रेल्वे धावतात यांचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला.
परिणामी मुंबईकडून कसाऱ्याकडे धावणाऱ्या व आसनगाव,कसारा,या मार्गावरील अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर एक्स्प्रेस व लोकल उशीरा धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुर्णतः विस्कळीत झाले यामुळे सकाळच्या वेळेस
मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांकडे प्रवास करणाऱ्या चाकरमानी, व प्रवाशांचे शनिवारी प्रचंड हाल झाले.लोकलची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांच्या गर्दीने लोहमार्गावरील कसारा, आटगाव, आसनगाव,वासिंद, टिटवाळा, आंबिवली, शहाड,कल्याण ही रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरली होती असे चित्र पाहण्यास मिळत होते.