डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील श्रीराम नगर आयरे गाव परिसरात पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. ५०० लीटर पाण्यासाठी टँकर ३०० रुपये घेतात, दररोज या परिसरातील नागरीक पैसे देऊन पाणी विकत घेत आहेत. महापालिकेकडून पाणी पुरवठा कमी दाबाने केला जातो. टँकर माफियांच्या फायद्यासाठी कमी दाबाचा पाणी पुरवठा केला जात आहे का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाणी टंचाई बाबत महापालिका अधिकारींना निविदेन दिले होते. डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा, राजूनगर परिसरात पाणी टंचाई आहे. ही पाणी टंचाई दूर झाली पाहिजे. या साठी मागणी निवेदन करुन ही समस्या सुटलेली नाही. तशीच परिस्थिती कल्याण ग्रामीणमधील श्रीरामनगर आयरे गाव परिसरात आहे. या ठिकाणी नागरीक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. ५०० लीटर पाण्याकरीता ३०० रुपये माेजावे लागतात. इथल्या महिलांनी महापालिकेकडे आपली व्यथा मांडण्यासाठी आल्या होत्या. त्याना हे देखील माहिती नाही. काेणाला भेटायचे. सात वर्षापासून ही समस्या या नागरीकांना भेडसावत आहे. आर्थिक परिस्थिती खराब असताना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.

सदर भाग कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात येतो. तसेच डोंबिवलीचे भाजप आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठिकाणी नागरीकांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. ही समस्या कधी सुटणार असा संतप्त प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *