पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यास  आमदार राम कदम यांचाही विरोध  

घाटकोपर : पदमावती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या विरोधात राजपूत समाजाने देशभर आक्रमक भूमिका घेतलेली दिसत आहे . चित्तोडची महाराणी पदमावतीचे चुकीचे दृश्य दाखवण्यात आल्याने राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असल्या कारणाने चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिगदर्शित केलेल्या या चित्रपटाला सर्वत्रच कडाडून विरोध होत असताना या विरोधात आता भाजपा आमदार , फिल्म स्टुडियो सेटिंग एंड एलायड मजदूर युनियनचे अध्यक्ष राम कदम यांनी  उडी घेतली असून, चित्रपटाला विरोध दर्शविलाय.
 भन्साळी हे एक उत्तम दिग्दर्शक असले तरी  चुकीचा इतिहास समोर मांडण्याचा त्यांना अधिकार नाही समाजाच्या भावना दुखावत असताना चित्रपट रिलीज होत असेल तर आमची युनियन हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याची भूमिका आमदार राम कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडली .  फिल्म स्टुडियो सेटिंग एंड एलायड मजदूर युनिअन मध्ये हजारो कामगार हे राजपूत समाजाचे आहेत त्यांना या चित्रपटातील दृश्ये चुकीचे वाटत असल्याने आमदार व युनियनचा अध्यक्ष या नात्याने आम्ही या चित्रपट प्रदर्शनाला विरोध करत आहोत . चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर तो  विरोध करणाऱ्याना दाखवावा व जे जे दृश्य चुकीचे वाटतील ते काढून टाकावेत मगच चित्रपट रिलीज करावा असेही राम कदम म्हणाले. चित्रपटातून असे दृश्य वगळले नाही तर संजय लीला भन्साळीचा कोणताही चित्रपटाचा सेट उभा करू देणार नाही असा इशाराही आमदार  कदम यांनी दिलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!