मंदिरात गाऊन घालून गेल्याचा जाब विचारल्यानं, महिला पोलीस अधिका-याची महिलेला मारहाण
कल्याण : गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं संतापलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं महिलेला मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडलीये. सोमवारी सायंकाळी तिसगाव भागातल्या तिसाई मंदिराच्या आवारात हा प्रकार घडलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पोलीसांनीच कायदा हातात घेऊन मारहाणीचा प्रकार घउल्याने स्थानिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजीची भावना पसरलीय. कल्याण पूर्वेतल्या या मंदिरात महिलांनी गाऊन घालून जाऊ नये असा नियम आहे . मात्र तरी सुध्दा प्रतीक्षा लाकडे या महिला पोलीस अधिकारी मंदिरात गाऊन घालून गेल्या. त्याचवेळी आशा गायकवाड या स्थानिक महिलेनं त्यांना जाब विचारला. त्यावेळी संतापलेल्या लाकडे यांनी गायकवाड यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मंदिरात गाऊन घातलेल्या महिलांना प्रवेश न देणं हा प्रकार चुकीचाच असला, तरी महिला पोलीस अधिकारी लाकडे यांना त्याबाबत तक्रार करता आली असती, मात्र त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे कल्याण पूर्व भागात पोलिसांबद्दल संताप व्यक्त होतोय. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी परस्परविरोधी एनसी दाखल करून घेतल्यानं पोलीस लाकडे यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप स्थानिकांचा आहे.
व्हिडीओ पहा
या महिला पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी,पण तशी ती होणार नाही कारण तेवढा पाठपुरावा करण्याची क्षमता तक्रारदाराकडे राहणार नाही एवढा त्रास त्यांना व्यवस्थेकडून होईल.
मंदिरात गाऊन घालून जाण्यास बंदी ? या मंदिराच्या व्यवस्थापनावरही कारवाई व्हायला हवी.
………पण अशा मंदिरात जायचंच कशाला ?