डोंबिवली : डोंबिवली – ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरूवारी सकाळी नऊ वाजता टिटवाळा-मुंबई एसी लोकलवर दोघांनी दगडफेक केली. या दगडफेकीत लोकलमधील एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून दोन गर्दुल्ल्यांना अटक केली.


डोंबिवली व ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान टिटवाळा-छत्रपती शिवाजी महारा्ज टर्मिनस लोकल धावत असते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ही लोकल ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत असताना ठाकुर्लीबाजुच्या वस्तीमधून एक दगड वातानुकूलित लोकलच्या खिडकीवर भिरकावण्यात आला. दगड वेगात आल्याने काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या एका महिलेला लागला. यात ती किरकोळ जखम झाली. मात्र यावेळी काही वेळ लोकलमध्ये प्रवाशांची घबराट उडाली. याप्रकरणाची तातडीने रेल्वे प्रशासनाला ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. ही माहिती डोंबिवली लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बाळाला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यावेळी दोन गर्दुल्ले ठाकुर्ली रेल्वे मार्गालगत बसून दगडफेक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक केली. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *