मुंबईत लवकरच तीन मजली शौचालय  : नवीन वर्षात १८ हजार ८१८ सीट्स बांधण्याचा पालिकेचा निर्णय 

मुंबई : मुंबई महापालिकेने शौचालये बांधण्यासाठी अधिक लक्ष केंद्रीत केले असून येत्या नव्या वर्षात १८ हजार ८१८ शौचकूप (सीट्स) बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.  मात्र भविष्यातील गरज लक्षात घेऊन शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचेही  प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३७६ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून, शैाचालयाच्या निविदा प्रक्रियेस महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मान्यता दिलीय.

नव्याने बांधण्यात येणा-या शौचालयांसोबतच धोकादायक अवस्थेत असणारी शौचालये पाडून त्याठिकाणी नव्या आरेखनानुसार पूर्नबांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या ११ हजार १७० शौचकुपांच्याच जागेत १५ हजार ७७४ शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना जुन्या शौचालयांच्या जागेत अतिरिक्त ४ हजार ६०४ शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त ३ हजार ४४ शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत. महापालिकेद्वारे गेल्या सुमारे २० वर्षात बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली शौचालये आहेत. मात्र भविष्यातील गरज लक्षात घेऊन शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर या शौचालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावरच सुयोग्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!