डोंबिवली : वडीलांच्या हत्येची तक्रार करणा-या मुलाला तक्रार मागे घेण्यास सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सागर सरकटे याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कल्याण ग्रामीण परिसरातील हेदूटणे गावात पाण्याच्या टँकर व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या संतोष सरकटे या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काहीं महिन्यापूर्वी घडली होती. मात्र या प्रकरणी संतोष यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबाने व्यक्त करीत या प्रकरणी चौकशीची मागणी केली. संतोष सरकटे यांचा मुलगा सागर याने याप्रकरणी तक्रार केली होती. मानपाडा पोलीस ठाणे नंतर कल्याण क्राईम ब्रँच कडून तपास सुरू होता. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांच्या पथकाने घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करत याप्रकरणी विजय पाटील आणि नितीन पाटील या दोन आरोपीना बेड्या ठोकल्या होत्या . विजय पाटील व नितीन पाटील हे दोघे सध्या तुरूंगात आहेत.
काल रात्रीच्या सुमारास सागर आपल्या दुचाकीने कल्याण शीळ रोडने जात असताना अचानक पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी सागरला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले , त्यानंतर सागरला शिविगाळ करत तू नितीन पाटील व विजय पाटील यांच्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घे, तुला परत सांगणार नाही. तु तुरूंगातून बाहेर येतील तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जीवे ठार मारू धमकी दिली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या सागरने पोलीस ठाण्यात पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी त्याने केली