ठाणे : महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केदार लखेपुरीया यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय कोळी समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भारत पेट्रोलियम महामंडळाचे संचालक घनश्याम शेर आणि राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोळी समाजाचे आराध्य दैवत भगवान महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करून महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या विविध समस्यांवर या सभेदरम्यान चर्चा करण्यात आली. राज्यातील आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे घटना दत्त आरक्षण मिळावेत याकरिता जात पडताळणीचे निकष निश्चित व्हावेत तरच आरक्षण सुलभरित्या मिळेल असा विचार राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यक्त केला. याबातच्या अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती अध्यक्ष केदार लखेपुरीया यानी उपस्थितांना दिली.
तसेच जळगाव येथे उपोषण करणाऱ्या कोळी समाज बांधवांना अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेच्जाया वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाचे धोरण राज्य सरकारं कडून ठरविले जाणार आहे. या करिता माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला राज्यातील मत्सयव्यवसाय विकासा बाबत निवेदन देणार असल्याची माहिती सरचिटणीस सचिन ठाणेकर यांनी अहमदाबाद येथून झूम मीटिंग द्वारे यांनी दिली.
राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत अखिल भारतीय कोळी समाज निर्णायक भूमिका बजावेल असा ठराव यावेली सभेने केला .

या प्रसंगी सल्लागार जितेंद्र गाढवे,राज्य उपाध्यक्ष डॉ हरीश कोरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल नाखवा साहेब, उपाध्यक्ष पराग पाटील युवा सचिव अजिंक्य दिपक पाटील , उपाध्यक्ष आनंद कोळी, खजिनदार कमल कासोटिया,युवा सचिव दिनेश रविंद्र भगत, मुंबई अध्यक्ष मीरा कोरी, स्मिता तरे, भूषण कोळी, जयंत नारोलिया उपस्थीत होते. अखिल भारतीय कोळी समाजाचे राज्यव्यापी अधिवेशन लवकरच घेण्याची घोषणा करण्यात आली.

कोट : राज्यातील आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे घटना दत्त आरक्षण मिळावेत याकरिता जात पडताळणीचे निकष निश्चित व्हावेत तरच आरक्षण सुलभरित्या मिळेल असा विचार राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यक्त केला. याबातच्या अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती अध्यक्ष केदार लखेपुरीया यानी उपस्थितांना दिली. तसेच जळगाव येथे उपोषण करणाऱ्या कोळी समाज बांधवांना अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *