चित्रकलेतून व्यसनमुक्त व स्वच्छतेचा संदेश
घाटकोपर ( निलेश मोरे ) समाजात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनांना बळी पडताना दिसतो आहे . घर , कार्यालय , शाळा परिसरात येणारे विद्यार्थी , कर्मचारी वर्ग यांना व्यसनांचे दुष्परिणाम तसेच स्वच्छतेचे महत्व समजावून दिले तर नक्कीच समाजाची हानी टळेल या उद्देशाने बालदिनाचे निमित्त साधून आर एन शेठ प्राथमिक व श्रीमती एस टी मेहता माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 6 ते 9 वी तील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते . तंबाखू मुक्त शाळा , स्वच्छ परिसर , पर्यावरण आदी विषय या चित्रकला स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते . विद्यार्थानी या विषयावर चित्रे काढली . शाळेतील 50 विद्यार्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता . विद्यार्थांनी काढलेल्या चित्रातून व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम , व्यसनमुक्ती , स्वच्छतेचे महत्व असे अर्थपूर्ण संदेश या चित्रातून दिले . शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या भट यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की आज 14 नोव्हेम्बर बालदिवस असून बालवयातील विद्यार्थाना चांगले आणि वाईट यातील फरक कळावा यासाठी आज आम्ही मुलांनां चित्रकला स्पर्धा आयोजित करून मुलांना तंबाखू मुक्त शाळा , स्वच्छ परिसर , पर्यावरण असे तीन सामाजिक विषय दिले जेणेकरून मुलांना हे विषय समजतील आणि ते इतरांना हा विषय समजावून सांगतील त्यामुळे समजावरची हानी टळेल . विद्यार्थी घडतील तरच देश घडेल असे मुख्याध्यापिका विद्या भट यांनी सांगितले .