एक हजार वंचित मुलांनी तयार केले शांततेचे भव्य प्रतीक 

घाटकोपर ( निलेश मोरे ) वोकहार्ट फाउंडेशन खेल खेल में उपक्रमातील एक हजार वंचित मुलांनी चेंबूरच्या बीएमसी मैदानावर 14 नोव्हेबर बालदिनी एकत्र येत पांढऱ्या टोप्या परिधान करत शांतता व एकोप्याचा संदेश देणारा भव्य प्रतिक तयार करून मुलांनी शांततेचा प्रचार केला . वोकहार्ट फाउंडेशन आणि द वर्ल्ड पीसकीपर्स मुव्हमेंट तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . खून , दरोडे , चोऱ्या , दहशतवाद या सारख्या घटना शहरात शांतता नष्ट करत आहेत आणि या घटनांमुळे समाजात निराशाजनक वातावरण तयार झाले आहे अशा वातावरणावर मात करण्यासाठी वोकहार्ट फाऊंडेशन आणि द वर्ल्ड पीसकीपर्स मुव्हमेंट ही संस्थेने समाजात शांतता निर्माण करण्याकडे पाऊल टाकले आहे . वोकहार्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हुझैफा खोराकीवाला यांनी सांगितले की एकनिष्ठ व उच्च बांधिलकेने आम्हाला समाजात शांतता प्रसार करायचा आहे आणि सकारात्मकता निर्माण करायची आहे . शांततेचा प्रसार करण्यासाठी लहान मुले हे सर्वात चांगले माध्यम आहे यासाठी आज बालदिनी आम्ही मुंबईतील एक हजार वंचित मुलांना एकत्र आणत जागतिक शांततेचा संदेश देणारा प्रतिक तयार केला असे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *