ठाणे, अविनाश उबाळे : महाराष्ट्रातील ताडोबा,नागझिरा, फनसाड,पेंच,या अभयारण्यांन पाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षीनिरीक्षक व निसर्ग प्रेंमीच्या पसंतीस उतरलं आहे.विशेष म्हणजे यापूर्वी मेळघाट व नंदुरबारच्या जंगलात आढलेले दुर्मिळ असे एक घुबड तानसाच्या जंगलात पक्षी निरिक्षकांना आढळून आले आहे वन पिंगळा म्हणून ओळख असलेली घुबडाची एक दुर्मिळ प्रजात येथे पक्षी निरक्षकांना सध्या भुरळ घालत आहे. ऑक्टोंबर महिना सुरू झाल्याने हिवाळ्याची चाहूल लागली आहे.या मोसमात मुक्तपणे जंगलात व तानसा तलावाच्या आसपास पक्ष्यांचा किलबिलाट आता सुरू झाला आहे.


ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या ३२० चौरस किलोमीटर आभयाण्याच्या क्षेत्र आहे यात तानसा ,खडी ,वाडा,परळी,सुर्यमाळ असे विस्तिर्ण असे अभायारण्य आहे या नुकताच आढळलेला वन पिंगळा वन्यजीव प्रेंमी व पक्षी निरिक्षक यांचे लक्ष तर वेधतोच परंतु तानसाच्या  जंगलात एकुण २१२ पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात  त्यातील ५५ पक्षी तानसा तलावाच्या आसऱ्यावर राहत आहेत यात झाडावर वास्तव्य करणारे १२६ पक्षी आहेत असे तानसा वन्यजीव विभागातुन सांगण्यात आले आहे सध्या हिवाळ्याच्या मोसमात पक्षी दर्शनासाठी पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमी पर्यटकांच्या गर्दीने सध्या तानसा आभयारण्य गजबजुन गेल्याचे चित्र दिसत आहे.आता तानसा तलाव वैतरणा,भातसा तलाव,व आजुबाजूला असलेल्या येथील सह्याद्री पर्वत रांगा मधील घनदाट जंगलातील दुर्मिळ पक्षी हिवाळ्याच्या मोसमात पक्षी निरीक्षकांना आता रोज नजरेस पडत आहेत.तानसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी सध्या पक्षीनिरीक्षक व निसर्ग प्रेमींना साद घालत आहेत.तानसा अभयारण्यात हिवाळ्याच्या मोसमात देशी व परदेशी पक्षी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर येथे संचार करताना आढळतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रीका देशातून भारतात येणारा स्थलांतरीत पक्षी चातक येथे आढळतो सध्या हिवाळ्या मोसमातील तानसा आभयारण्यात येणारे विविध पक्षी निरीक्षक,व निसर्ग प्रेमी,व पर्यटकांचे लक्ष वेधुन घेत आहेत.

वन पिंगळा

तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या,भृंगराज ,कोतवाल ,कोकीळ ,हळदया ,नाचन ,घुबड,पिंगळ्या ,खारीक टक्कोचोर ,सुतार ,टिटवी खंड्या ,दयाळ ,लाव्हे , तिथर ,शिकरा, धोबी,पित्ता ,गरुड ,घार से ,सादबहीणी ,करकोचा ,पोपट ,मोर आदि विविध पक्षी तानसा आभयारण्यात वास्तव्य करीत आहेत अभयारण्यात या पक्ष्यांचे सर्वत्र भ्रमण सुरु असते वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणाऱ्या लाल पिवळ्या काळ्या  निळ्या हिरव्या रंगाचे हे पक्षी सर्वांनचेच आता लक्ष वेधून घेत आहेत या पक्ष्यांच्या सवयी आवाज खाद्य शिकारीच्या पध्दती राहण्याची ठिकाणे घरटी वेगवेगळी पहावयास मिळतात असे पक्षीनिरीक्षक रोहीदास डगळे यांनी माहिती देताना सांगितले हे सर्व पक्षी तानसाच्या जंगलात आढळतात  महाराष्ट्रातील.ताडोबा ,नागझिरा,फणसाड, पेंच या अभयारण्याबरोबर तानसा आभयारण्यातही हे पक्षी न्याहाळण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह निसर्गप्रेमींच्या वाटा तानसा भयारण्याकडे सध्या वळल्या आहेत.

थंडीची चाहूल लागताच तानसाच्या जंगलात हिवाळ्या मोसमात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येथे आढळून येतात या पक्षांचं निरिक्षण व अभ्यास करताना एक सुखद व विलक्षण अनुभव मिळतो
दामू धादवड, पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *