ठाणे, अविनाश उबाळे : गरम गरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ, नाचणी, वरई अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. पण महाराष्ट्रात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये नाचणी ( नागली ) ची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. या नाचणीच्या भाकरीच्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये मॅग्नेशियम ,फॉस्फेट सारखे अनेक पोषक घटक असतात. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी नाचणी ची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते .विशेषता वृध्द व्यक्तींसाठी नागलीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजली जाते. नाचणी ही अगदी लहान मुलांपासून मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते.
 

नाचणी सध्या  ४० ते ४५ रुपये किलो —
ठाणे जिल्ह्यातील बाजारात नागली ४० ते ४५ रुपये किलो दाराने मिळते. जिल्ह्यात नाचणी चे उत्पादन इतर जिल्ह्यांच्या मानाने अधिक घेतले जात आहे. त्यामुळे नाचणी ची भाकरी खाणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.
 

डायबेटिस आजारावर गुणकारी —
नाचणी ची भाकरी डायबेटिस आजारावर अत्यंत गुणकारी असल्यामुळे नाचणी ची भाकरी खाल्याने शुगर आटोक्यात राहते. व शरीरात रोगप्रतिकारक   शक्ती वाढते . हिवाळ्यात नाचणी खाणे आरोग्यदायी व अत्यंत लाभदायक असल्याने नाचणी च्या भाकरी खाण्याचे प्रमाण वाढले आहे.नाचणी ( नागली ) महागणार  असे बोलले जात आहे. मात्र नवीन पीक बाजारात आल्यामुळे दर कमी होणार असल्याचे व्यापारी सांगतात.

जिल्ह्यात नाचणीचे इतके क्षेत्र
जिल्ह्यात धान पीक महत्त्वाचे असून सर्वाधिक धान शेतीच केली जाते. शिवाय भाजीपाला तसेच काही प्रमाणात घेतली जातात.मात्र त्या खालोखाल चार हजार हेक्टरवर नाचणी  व इतर पिके घेतली जातात .मात्र नागलीचे पीक जिल्ह्यात कमी प्रमाणात घेतले जात असेल तरी  कृषी विभाग दरवर्षी मोफत बियाणे देऊन ते वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र थोड्या दिवसानंतर नाचणी बाजारात आल्यानंतर तिची आवक वाढणार आहे.
   

येथून होते आवक —-
ठाणे जिल्ह्यामध्ये  मोखाडा, जव्हार ,शहापूर ,येथे मोठ्या प्रमाणावर नाचणी चे उत्पादन घेतले जाते आणि ती  मोठ्या प्रमाणावरती जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये येते.

नाचणी चे या वर्षी चांगले पिक आले असून आता अवकाळी पाऊस आला तरच त्याचे नुकसान होऊ शकते अन्यथा पीक चांगले आहे. ठाणे जिल्ह्यामध्य चांगला पाऊस झाला असून पीक चांगले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.   यंदा पाऊस चांगला झाला असला तरी उशिराने आल्याने नाचणीचे कमी मात्र क्षेत्र वाढल्याने पीक मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याची शक्यता आहे. हिवाळ्यामध्ये नागलीच्या भाकरी खाणे हे शरीराला अतिशय चांगले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याची खरेदी होणार आहे. मात्र याचा बाजारभावावर फारसा परिणाम होणार नाही : — रमेश अग्रवाल व्यापारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *