चिमुकल्या हाताने झाला डिझायर संस्थेचा श्रीगणेशा
बालदिनी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
कल्याण : सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने कमलेश भोईर या तरुणाने आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केलेल्या डिझायर फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा श्रीगणेशा बालदिनाचे औचित्य साधून चिमुकल्यांच्या हस्ते करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील नवजीवन विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
आजही अनेक छोट्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून या विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता नेहमीच जाणवत असते, अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून डिझायर संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर यांनी कल्याण मधील नवजीवन विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना बाल दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्य भेट म्हणून दिले. तसेच भोईर यांनी आपल्या या संस्थेचा श्रीगणेशा देखील या चिमुकल्यांच्या हातून केक कापून केला.
आगामी काळात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे अक्षय देसले, सागर भोईर, अजिंक्य सातवे, सुरज जाधव, निजाम अत्तार, विकी ठोंबरे, प्रिया भोईर आदी जण उपस्थित होते.
Asach pudhe ja
Khup chan….
Konala help karnyat Jo anand ahe to kashat nahi.