मुंबई गोवा महामार्गावरील प्रकल्प बाधितांना दिलासा
भाजपाच्या शिष्टमंडळाची मुख्यसचिवांसोबत बैठक
मुबई (अजय निक्ते) : कणकवली व कुडाळ येथील मुंबई गोवा महामार्गावरील प्रकल्प बाधित आक्रमक होत विविध मागण्यासंदर्भात भाजपाचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, राजन तेली यांच्यासह प्रकल्प बाधितांच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिव विकास खर्गे यांच्या दालनात संयुक्त भेट घेत कैफियत मांडली. योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन खर्गे यांनी दिल्याने प्रकल्प ग्रस्तना दिलासा मिळाला आहे.
भूसंपादन विभागाकडून दिल्या गेलेल्या नुकसानभरपाई सूचना सदोष असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच एकाच प्रकारच्या व एकाच ठिकाणच्या जमिनींना वेगवेगळ्या आकारणी करणे आदी संदर्भात ही भेट घेण्यात आली यावेळी झालेला बैठकीत शहरातील प्रकल्प बधितांना रेडी रेकनर नुसार दर देणे, महामार्गालगतच्या ‘अ’ वर्गातील जमिनींच्या सरासरी दरानुसार सर्व जमिनींना सरासरी मोबदला मिळावा आदी मुद्दे मांडले . या मागण्यांना मुख्यसचिव विकास खर्गे यांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच सर्वेक्षण करून निवडा जाहीर करण्यापूर्वी भूखंडाचे व इमारतीचे मूल्यांकन संबंधित धारकाला कळविले गेले नसल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्य केले. याबाबत देखील योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही खर्गे यांनी शिष्ट मंडळाला दिली. या बैठकीत कणकवली कुडाळ या बरोबरच खारेपाटण ते झाराप दरम्यानच्या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्याची ग्वाही देण्यात आली. खारेपाटण येथील नोटिसा न मिळता जमिनी इमारती ताब्यात घेण्याच्या गंभीर विषयावरही सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
—————————