500 निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप : आमदार राम कदम यांचा संकल्प
घाटकोपर : विधवा वा कुटुंबात कोणताही आधार नसणाऱ्या गरीब महिलांना स्वतंत्रपणे रोजगार करता यावा या हेतूने घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या विभागातील 500 गरीब निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा संकल्प केला आहे त्यापैकी 30 महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले . प्रत्येक रविवारी आमदार राम कदम यांच्या निवास स्थानी या मशीन वाटप करण्यात येणार आहेत . यावेळी आमदार कदम म्हणाले की, ज्या महिलांना कुणाचा आधार नाही मात्र त्यांच्यावर कुटुंब अलंबून आहे ज्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते त्या निराधार महिलांना स्वतंत्र रोजगार करता यावा हीच या मशीन वाटप करण्यामागची संकल्पना असल्याचे कदम यांनी सांगितलं.