हैदराबादः आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांना विजयवाडा येथे हलविण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशच्या गुन्हा अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री घडलेल्या नाट्यमय घटनांनंतर आज पहाटे नायडू यांना अटक केली. चंद्राबाबू नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये (Skill Development Corporation) गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये नायडू यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे.
चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे. सध्या चंद्राबाबू नायडू नांदयाल दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आंध्रप्रदेशचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.