बंगळुरु : चांद्रयान ३ च्या यशानंतर इस्त्रोनं आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आदित्य एल १ पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील लँग्रेड १ या पॉइंटला पोहोचून अभ्यास करणार आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर आदित्य एल १ चं यशस्वी प्रक्षेपण करुन इतिहास रचला.
आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल.
आदित्य एल १ च्या लाँचिंगनंतर इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चांद्रयान ३ बाबत महत्त्वाची अपडेट दिली. प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १०० मीटरचं अंतर पार केल्याची माहिती इस्त्रोद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी प्रज्ञान रोवरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला होता. तो फोटो लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सनं बनवला होता. प्रज्ञान रोवरवर दोन नॅवकॅम लावण्यात आलेले आहेत. त्या द्वारे फोटो काढण्यात आला होता.
प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर जोपर्यंत सौर ऊर्जा मिळत राहील तोपर्यंत कार्यरत राहतील. चंद्रावरील एक दिवस हा १४ दिवसांचा असतो त्या कालावधीत चांद्रयान ३ कार्यरत असेल. प्रज्ञान रोवरवर सोलर पॅनल लावण्यात आलेलं असून त्या द्वारे रोवरला ऊर्जा मिळते. प्रज्ञान रोवरवर दोन नॅवकॅम लावण्यात आले आहेत त्याद्वारे चंद्राच्या भूभागाचे आणि विक्रम लँडरचे फोटो इस्त्रोला उपलब्ध आहेत.
चांद्रयान ३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भूभागाचा अभ्यास सुरु केलेला आहे. चांद्रयान ३ चं प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडरवरील उपकरणांकडून माहिती गोळा केली जात आहे. प्रज्ञान रोवरनं चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर म्हणजेच गंधक, लोह, मँगनीज यासारखे इतर घटक असल्याची माहिती इस्त्रोकडे दिली होती. तर, विक्रम लँडरवरील चास्ते या उपकरणानं चंद्राच्या तापमानातील फरकाची नोंद इस्त्रोकडं पाठवली आहे.
आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल.