मुंबई : बहुचर्चित ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे. महामार्गाच्या दिरंगाईच्या प्रश्नावर मंत्री चव्हाण यांनी डोंबिवलीत खुले चर्चा सत्राचे आयोजन केले आहे. रविवार २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजता डोंबिवली जिमखाना, पेंढारकर कॉलेज, डोंबिवली पूर्व येथे चर्चा सत्र होणार आहे. विशेष म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी थेट संवाद साधता येणार असल्याने, कोकणवासीयांक्या मनातील प्रश्नांना थेट उत्तर मिळणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या कोकणातील सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार यांच्या मनात या महामार्गाच्या कामाबाबत काही मुद्दे असतील तर ते समजून घेवून त्यांचे निरसन करण्यासाठी, सध्या सुरू असलेले काम अधिक सुसाट वेगाने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची मत – मतांतरे जाणून घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खुले चर्चासत्र आयोजित केले असून, आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या महामार्गासाठी आंदोलन करणारे संघटना, संस्था, मोबदला न मिळालेले जमीन मालक अशा सर्वांना थेट मंत्री महोदयांशी संवाद साधून उत्तर मिळणार आहेत.

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभार हाती घेतल्यापासून अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या संपूर्ण विषयाचा गांभीर्याने अभ्यास करून या कामातील असंख्य अडचणी दूर करीत या कामाला गती दिली. मंत्री पदाची धुरा सांभाळल्या पासून मुंबई – गोवा रोडची आठ(८) वेळा प्रत्यक्ष पाहाणी करून कामावर देखरेख ठेवीत कामाचा आढावा घेतला. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. राज्यातील मंत्र्याने अशाप्रकारे चर्चा सत्र लावून सामुदायिकपणे लोकांचे प्रश्न सोडविण्याचा हा पहिलाच कार्यक्रम ठरणार आहे.

या चर्चासत्रानंतर मंत्री महोदयांच्या पुढाकाराने खास कोकण स्टाईल पाहुणचार करण्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या चर्चा सत्रात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठी जयवंत दरेकर(९८२१५६२५७७), काका कदम(७५०६२५४४४५), अक्षय महापदी (८०९७१६७९८७), राजू मुलुख (८४५१०९७१३६), उदय सुर्वे (७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!