मुंबई- देशात इंडियाला आणि राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. देशातील आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता घसरत असल्याने निवडणुका घेण्यात येत नाही आहे. जर निवडणुका घेतल्यास मोठ्या प्रमाणात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जर निवडणूक घेतल्यास त्यात पराभव होण्याची शक्यता वाटत असल्याने निवडणुकीचा फटका बसला तर त्याचा परिणाम राज्याचा निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून निवडणूका पुढे ढकलण्यात येत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात कुठलेही मतभेद नाही आहे. लोकशाहीसाठी घातक असलेल्या भाजपला पराभूत करण्याकरिता आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो आहे तर देशात इंडिया एकत्रित आले आहे. राज्यात तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप बाबत असंच असणार आहे की ज्या जागा जे जिंकतील त्यांना दिलं जाईल. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर त्याला नक्कीच संधी दिली जाईल. हा फॉर्मुला ठरलेला आहे. सोलापूर काँग्रेस साठी होती आणि माढा राष्ट्रवादी. त्यावेळी सगळे निर्णय होतील असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आपली भूमिका भाजपसोबत न जाण्यासंदर्भात स्पष्ट करावे यावर राजू शेट्टीने केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, या आधी स्पष्ट केले आहे की आमचे विचार भाजप च्या विचाराच्या विरोधात आहे आमची लढाई वैचारिक आहे. शरद पवार साहेबांनी किती वेळ सांगायचं की मी जातीय वादी पक्षांसोबत जाणार नाही. असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!