मुंबई दि. १८ ऑगस्ट : राष्ट्रवादीला खिंडार पाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा केला असतानाच, आता अजित पवार हे पक्षवाढीसाठी मैदानात उतरले आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कळविले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!