मुंबई दि. १६ : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संचलित कुणबी विद्यार्थी वसतीगृह व कुणबी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. परळ येथील वाघे हॉल येथे संघांचे उपाध्यक्ष सदानंदजी काष्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध शाखांमधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज, कुणबी समाजोन्नती संघाच्या त्रिमूर्ती माळी गुरुजी, शामराव पेजे आणि वाघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. देशभक्ती विषयी आणि कुणबी समाजाप्रतीचे विचार यावेळी मांडण्यात आले. दरम्यान, सध्या स्पर्धेच्या युगात पाय रोवण्यासाठी मराठी बरोबरच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवावे. स्पर्धा परिक्षेची तयारी करावी, देशात सतर्क नागरिक बनावे आणि न्याय हक्क मागण्यांसाठी झगडण्याची जिद्द ठेवावी, असे आवाहन उपाध्यक्ष सदानंद काष्टे यांनी केले.
गुहागर युवक मंडळाचे माजी अध्यक्ष गिरीश बारस्कर, कुणबी युवक मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश कावणकर, उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, कुणबी युवा गुहागरचे कार्यकर्ते संजय काजारे, चिपळूण शाखेचे गणपत काजारे, पत्रकार काशिनाथ म्हादे, माजी विद्यार्थी प्रमुख उदय गोणबरे, विद्यार्थी अंकित मोरडेकर, हितेश वाघोस्कर, अमर कोकमकर, प्रितेश वाकडे, प्रणय धुरी, हृ्तिक किंजले, धीरज पातेरे, सुरज बावकर, सुरज लांबाडे, राज पाटील, प्रणित धुरी, जयेश पाटील आदी उपस्थित होते.