मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईला झोडून काढलं आहे. जोरदरा पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुबंईकडे जाणार्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहचण्यास उशीर होत आहे.
मुंबईत काल दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज सकाळी देखील मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विविध भागात पाणी साचले आहे. पावसामुळे रत्यावर वाहनाने प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसात मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कसारा लोकल आसनगाव स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तर आसनगावरील लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आल्या आहेत. तर मुंबई सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धाव आहेत.
आटगाव स्थानकात गोरखपूर एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकांत रद्द करण्यात आली. मुंबई कडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जनता एक्सप्रेसला कसारा ते कल्याण पर्यंत सर्वच स्थानकावर थांबा देण्यात आला.