भिवंडीच्या विकासासाठी भाजप सरकारकडून कोट्यवधींचा निधी पण सत्ताधा-यांकडून विकासकामात अडथळे

भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांचा आरोप

भिवंडी :  राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने  भिवंडी शहरातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.मात्र पालिका सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेना विकास कामांमध्ये अडथळे आणत आहे असा आरोप भाजप शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषेदेत केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये खासदार कपिल पाटील,आमदार महेश चौघुले यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळेच शहरातील मुख्य अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका रस्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून काँक्रिटीकरणाचे काम सुरु केले आहे.शहरांतर्गत ५२ रस्त्यांच्या काँक्रीटिकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यापैकी लवकरच १२ रस्त्यांच्या कामास सुरवात होणार आहे.मात्र पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वेळेत कार्यवाही होत नसल्याने विकास कामांना उशीर होत असून शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला आहे.येत्या काही दिवसात पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही तर त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असे शेट्टी यांनी सांगितले. खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून भिवंडी शहराच्या पाणी योजनेसाठी अमृत योजनेमधून सव्वादोनशे कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध होत आहेत त्यामुळे महानगरपालिकेवरील आर्थिक भुर्दंड वाचणार असून याचे सर्व श्रेय  पक्षाचे  असल्याचे  शेट्टी यांनी सांगत पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून शासन स्तरावरून विविध योजनांचा पाठपुरावा सुरु असताना महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस,शिवसेना व प्रशासन हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा नाहक मनस्ताप शहरवासीयांना भोगावा लागत आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांकरीता तब्बल ७० कोटी

मुख्यमंत्र्यांनी भिवंडीसाठी मेट्रोची भेट दिली असून त्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. ” होय हे माझे सरकार ” हे ब्रीद ख-या अर्थाने सर्व महाराष्ट्रातील जनतेचे घोषवाक्य होण्यास वेळ लागणार नाही.  तीन वर्षात उभे राहिले असून भ्रष्टाचार,पारदर्शक कार्य या तीन वर्षात झाल्याने सर्वसामान्य जनता समाधानी असल्याचे प्रतिपादन आमदार महेश चौघुले यांनी केले.  भिवंडी शहरातील न्यायालय इमारतीसाठी ३८ कोटी व भिवंडी शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांकरीता तब्बल ७० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले असून खोणी,खाडीपार,काटई, कारीवली,शेलार ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामास सुरवात झाली असल्याने येत्या वर्षभरात या भागातील नागरी सुविधांचा कायापालट होणार आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन काम करण्यात असमर्थ ठरत असल्याने आम्ही स्वतः एमएमआरडीएच्या अधिका-यांसोबत बैठक घेवून विकास कामे मार्गी लावू असे आमदार महेश चौघुले यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी गटनेता निलेश चौधरी,विरोधी पक्ष नेता श्याम अग्रवाल,सरचिटणीस ऍड.हर्षल पाटील,प्रेषित जयवंत,प्रेमनारायण रॉय,महिलाध्यक्षा ममता परमाणी ,युवा अध्यक्ष ऍड.वैभव भोईर,विशाल पाठारे,नगरसेवक प्रकाश टावरे,यशवंत टावरे,साखराताई बगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *