मुंबई: येत्या १ जुलै रोजी  शिवसेना ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. यासाठी आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर खरमरीत टीका केली.
पाटण्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे कुटुंब बचाओ बैठकीला गेले आहेत.”, अशी टीका फडणवीसांनी केली होती. मात्र ठाकरेंच्या
टीकेला फडणवीसांनी त्याच शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना रंगला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका कुटुंब तुम्हाला देखील आहे. आम्ही त्यावर आलेलो नाही. आमच्याकडे व्हाट्सअप चॅट आहेत हे लक्षात ठेवा. जर कुटुंबावर आलात तर केवळ शवासण करावं लागेल हे लक्षात ठेवा, असं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ठणाकावून सांगितलं आहे.

तर फडणवीस यांनी ट्विट करीत ठाकरेंना प्रतिउत्तर दिलंय. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !

ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा, सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
मुंबईला कुणी लुटले यावर…मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर… मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते… असे फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *