शहापूर (अविनाश उबाळे) : भिवंडी उपअभियंता शशिकांत धोंडू चौधरी यांचा सेवापूर्ती. सोहळा नुकताच भिवंडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आपल्या ३७ वर्षाच्या कार्यकाळात स्वच्छ प्रतिमा आणि शिस्तबध्द मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांनी छाप उमटवली.

शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागातील खराडे या खेडेगावातील शशिकांत चौधरी यांनी सिव्हिल डिप्लोमाचे शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घेऊन ते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर 1984 साली रुजू झाले. या कालावधीमध्ये वाडा, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड अशा विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी कधीही संयम सोडला नाही. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी तब्बल 37 वर्ष 7 महिने सार्वजनिक बांधकाम विभागात लोकसेवकाची भूमिका स्वच्छ प्रतिमा दाखवून बजावली. दरम्यान त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बांद्रा येथे पदोन्नती मिळून ते उप अभियंता पदावर रुजू झाले. नुकताच भिवंडी येथे उप अभियंता पदावरून चौधरी सेवानिवृत्त झाले आहेत.शहापूर सारख्या आदिवासी दुर्गम तालुक्यातील शशिकांत चौधरी यांनी कनिष्ठ अभियंता ते उप अभियंता ही घेतलेली गरुड झेप तरुणांच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारी ठरेल.अतिशय मनमिळावू आणि तितकेच कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.त्यांची संयमाची आणि कर्तव्यदक्षतेची भूमिका इतरांच्या भावी आयुष्यात डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे.

सदर कार्यक्रमास ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे, मराठा सेवा संघ ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे, सेव निवृत्त उप अभियंता राजेश सोमवंशी, ठेकेदार बाळकृष्ण ठाकरे, संचालक संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ज्ञानेश्वर पवार , शहापूर उप अभियंता सदाशिव येजरे, उप अभियंता संजय कोरडे, उप अभियंता प्रशांत मानकर, उप अभियंता संपदा मोहरीर,सेवा निवृत्त उप अभियंता दिलीप चौधरी, सेवा निवृत्त उप अभियंता महाडिक, ठेकेदार, पत्रकार मित्र, कार्यालयीन अभियंता, कर्मचारी वर्ग कुटुंबीय व आप्तेष्ट या सेवापूर्ती समारंभात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *