मुंबई : ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झाला.
गार्गी फुले म्हणाल्या की, राष्ट्रवादीची विचारसरणी आणि तत्वे आहेत. ती माझी स्वत:ची आणि बाबांची तत्वे होती. त्या तत्वांना न्याय कोण देऊ शकेल. तर राष्ट्रवादी. किनाऱ्यावर बसून गोष्टी बघू नये प्रवाहात उतरुन काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्विकारेन. असे गार्गी फुले म्हणाल्या.
गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation या विषयात पदवीधर आहेत. 1998 पासून त्या प्रायोगिक नाट्य चळवळीशी संबंधित आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ, कोवळी उन्हे , श्रीमंत , सोनाटा, वासंसी जीर्णनी, सुदामा के चावल, या नाटकात काम केले आहे. तर गरगी यांनी आजवर राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी अशा गाजलेल्या मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे. याशिवाय नाटकांचेही पोषाखांचे डिझाईनही गार्गी फुले यांनी केलं आहे.