महाड सावित्री पुलावर ट्रक आणि एस.टी. चा अपघात
ट्रक चालक ठार तर ३५ प्रवासी जखमी
महाड –(निलेश पवार) : मुंबई गोवा महामार्गावर महाड मधील सावित्री पुलावर गुरुवारी तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि गुहागर एस.टी. बस मध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात नवीद आब्बास वास्ता हा ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. हा श्रीवर्धन येथील मेतकरनी येथील रहिवाशी हेाता. तर एस.टी.मधील ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका तीन वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ट्रक चालक विरुद्ध दिशेने आल्यानेच हा अपघात झालाय. सावित्री नदीच्या ज्या पुलावर यापूर्वी घटना घडली होती त्याच ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरच हा अपघात झाला. मुंबई गुहागर हि एस.टी.बस मुंबईकडे जात असताना पोलादपूर कडून मुंबईकडे जाणारा ट्रक नवीन झालेल्या पुलावरून न जाता जुन्या पुलावरून आल्याने समोरासमोर धड बसून अपघात झाला. जखमी प्रवाशांना महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.
एसटीतील जखमी प्रवाशांची नावे
सुशांत सुरेश आंग्रे ( वय २७ )रा. चीरणी खेड,
रेखा राजाराम चाळके वय ( वय २७ ) लोटे चिपळूण,
कस्तुरी काशीराम अजवळकर ( वय ४७ ) कारोल गुहागर,
प्राची प्रशांत जाधव ( वय २७ ) कवडर बौध्दवाडी चिपळूण,
प्रशांत दिलीप जाधव ( वय ३१ ) कवडर बौध्दवाडी चिपळूण,
संदीप विठ्ठल जाधव ( वय ४५ ) डोडवली,
मुफिजा अल्ताफ केळकर ( वय २७ ) सुरळ गुहागर,
दीपक बाबू उतेकर ( वय ६१ ) ६१ कुर्ला मुंबई,
अंजना सखाराम उतेकर ( वय ८० ) ८० भरणानाका खेड,
सीताराम दत्ताराम धनावडे ( वय ५७ ) ५७ भरणानाका खेड,
सावित्री सदाशिव कातळकर ( वय ६६ ) ६६ तळी गुहागर,
ज्ञानेश्वर सोमा सोनकर ( वय २० ) २० तळी गुहागर,
सुनिता सुरेश घडवले ( वय ६५ ) ६५ आरेगाव गुहागर,
श्रीमती सुनिता रघुनाथ दहीवलकर( वय २७ ) ६८ आडूर गुहागर,
श्रीमती चंद्रप्रभा विठू सैतवडेकर ( वय ५८ ) ५८ कारूळ गुहागर,
एकनाथ तुळाजी सैतवडेकर ( वय ६१ ) ६१ कारूळ गुहागर,
सुषमा एकनाथ सैतवडेकर वय ५० कारूळ गुहागर,
सुप्रिया सुभाष सुर्वे वय ४० रानवी गुहागर,
आश्विनी चंद्रकांत सातवे वय ४० शांताराम तलाव मालाड,
दत्ताराम बाळू सोलकर वय ६५ विरार,
सुनिता अनंत शिर्के वय ७० मालाड,
शरद अनंत शिर्के वय ४२ मालाड,
दिपाली महेंद्र कदम वय १७ आंबोरे चिपळूण,
भाऊ सदाशिव कदम आंबोरे चिपळूण,
सुरेश धोंडू माळी वय ६० खेर्डी चिपळूण,
संतोष लक्षमण कदम वय ४५ घुगे चिपळूण,
नूरमोहम्मद इब्राहीम लालू वय ७० सुरळ गुहागर,
दिलीप महादेव मनवल वय ४४ मालाड मालवणी,
सुधाकर अमृतलिंग जंगम वय ७८ विरार,
सौ.खातूल नूरमोहम्मद लालू वय ७० सुरळ गुहागर,
संदेश सुरेश माळी वय ३२ खेर्डी चिपळूण,
सौ.दर्शना दिलीप मनवल मालाड मालवणी,
कु.त्रिवेणी सुशील पारधी वय ३ कारूळ गुहागर,
राजेश गणपत वसावे वय ४१ बस वाहक गुहागर आगार,
मुक्तार वजीर सय्यद वय ३३ चालक गुहागर आगार,