नवी मुंबईच्या महापौरपदी जयवंत सुतार तर उपमहापौरपदी मंदाकिनी म्हात्रे
नवी मुंबई : नवी मुंबईच्या महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत सुतार यांची महापौरपदी निवड झाली. तर उपमहापौरपदी मंदाकिनी म्हात्रे या निवडून आल्या. नवी मुंबईवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत सुतार यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा २९ मतांनी पराभव केला. सुतार यांना ६७ मते मिळाली तर सोमनाथ वास्कर यांना ३८ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांना ६४ मते मिळाली. शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांना ३८मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली हेाती मात्र त्यांना अवघे ३ मते मिळाली.