कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसने भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला. आतापर्यंत 224 पैकी 223 जागांचे निकाल हाती आले आहेत. काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केला असून भाजपची ६५ जागांवर घसरगुंडी झाली आहे. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ मतदार संघात १० मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणी काँग्रेसला सर्वाधिक १३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर विजय मिळाला आहे. जेडीएसला १९ जागांवर विजय मिळाला आहे. तर ४ अपक्ष आमदारांचा विजय झालाय. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ४२.९८ टक्के मते मिळाली, तर भाजपला ३५.९१ टक्के मते मिळाली आहेत. याशिवाय जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकमध्ये मोठा प्रभाव दिसला आहे. भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी या लढाईत राहुल गांधींची पदयात्रा विजयी ठरली असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. कर्नाटकातील 20 विधानसभा मतदारसंघांपैकी ज्या मतदार संघातून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली. त्यापैकी १५ मतदारसंघ काँग्रेसने जिंकले. जेडीएसने ३ तर भारतीय जनता पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा अतिशय दारूण पराभव झालाय. हा पराभव भाजपच्या अतिशय जिव्हारी लागले इतका भयानक निकाल आहे. भाजपने कर्नाटकमधील ३१ पैकी २५ मंत्र्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. पण त्यापैकी तब्बल १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा झटका मानला जातोय. विशेष म्हणजे जलसंधारण, परिवहन, लघू-मध्य उद्योग, आरोग्य, नगर प्रशासन, युवाविकास, महिला बालकिवास, वस्त्रोद्योग, शालेय शिक्षण, फलोत्पादन अशा विभागाच्या मंत्र्यांना जनतेने थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – १३६ (विजय – १३४, आघाडी – ०२)

भाजपा – ६४ (विजय – ६४, आघाडी – ०१)

जेडीएस – १९ (विजय)

इतर – ०४ (विजय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!